Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
ऐक्य समूह
Saturday, February 03, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re1
5वडूज , दि. 2 : येथील सातेवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत धनसिंग वालू राठोड, रा. मायणी (वय  70) हे जागीच ठार झाले तर मुकुंद हणमंत गायकवाड (रा. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची नोंद रात्री उशिरा वडूज पोलीस ठाण्यात झाली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनसिंग वालू राठोड, मुकुंद हणमंत गायकवाड हे मोटारसायकल (क्र. एम. एच. 10 बीई 2467) यावरून निघाले असता अज्ञात वाहनाने सायंकाळी  6 च्या सुमारास त्यांना ठोकर दिली. या अपघातात धनसिंग वालू राठोड हे जागीच ठार झाले तर मुकुंद हणमंत गायकवाड हे गंभीर जखमी झाले. मुकुंद गायकवाड यांना अधिक उपचारासाठी वडूज ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. धनसिंग राठोड यांच्या मृतदेहाचे रात्री उशिरा वडूज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. जखमी गायकवाड यांना अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार शांतीलाल ओंबासे तपास करत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: