Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयनेसह पाटण परिसरात 3.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
ऐक्य समूह
Saturday, February 03, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: re3
5पाटण, दि. 2 : पाटण तालुक्यासह कोयना धरण परिसरात शुक्रवार, दि. 2 रोजी सकाळी 7.11  वाजण्याच्या सुमारास 3.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपामुळे काहीकाळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 21.6 किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यात जावळे गावच्या दक्षिणेला 2 कि. मी. अंतरावर होता.  भूकंपाची खोली 14 कि. मी. अंतरावर होती. हा भूकंप पाटण,  कराड, चिपळूण या तालुक्यांसह जावली विभाग व रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी, अलोरे यासह वारणा खोर्‍यात अनेक ठिकाणी जाणवला. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: