Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्हा रुग्णालयासमोरील अपघातात महिला ठार
ऐक्य समूह
Friday, February 02, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 1 : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासमोर एका दुचाकीने भरधाव वेगाने पादचारीमहिलेला धडक दिली.
या घटनेत महिला गंभीर जखमी झाली.उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे.
मृत महिलेचे संगीता श्रीपती घाडगे (वय 39, रा. सिव्हिल वसाहत) असे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. धडक देणारी दुचाकी ही (क्र. एम. एच. 11-8066) हिरो कंपनीची सीबीझेड  मॉडेलची असल्याचे तेथील नागरिकांनी बघितले असून तशी माहिती त्यांनी पोलिसांना कळवली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: