Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
करारानुसार ऊसतोड टोळी न पुरविल्याने एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Friday, February 02, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि.1: सन 2016-2017 मध्ये अर्जुन राघू काळे, रा. बीड, बार्शी नाका, जि.बीड याने करारानुसार सुमारे 5 लाख रुपये घेवूनसुद्धा ऊस तोडणीसाठी ऊसतोड टोळी पुरविली नाही व घेतलेले पैसे परत न दिल्याने फसवणूक केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली. या प्रकरणी राजेंद्र संभाजी थोरात (वय 42 वर्षे), रा. वडगाव हवेली यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वडगाव हवेली, ता. कराड येथील राजेंद्र संभाजी थोरात यांचा ट्रॅक्टर असून ते कृष्णा साखर कारखान्यात ऊस वाहतुकीचे काम करतात. त्यांनी ऊसतोड कामगार पुरविण्यासाठी 2016-2017 करता अर्जुन राघू काळे, रा. बीड यांच्याशी करार केला होता. ऊसतोड कामगारांच्या टोळी पुरविण्यासाठी रोख व बँक खात्यावर असे सुमारे 5 लाख रुपये राजेंद्र थोरात यांनी अर्जुन काळे याला दिले होते. परंतु, ठरलेल्या करारानुसार काळे यांनी ऊसतोडीसाठी टोळ्या पुरविल्या नाहीत म्हणून पैसे परत मागितले असता ते दिले नाहीत. पैसे मागितले असता काळे यांनी शिवीगाळ करून दमदाटी केल्या प्रकरणी व फसवणूक केल्या प्रकरणी थोरात यांनी फिर्याद दिली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: