Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बजेटला 10 पैकी 3 गुण देता येईल : आ. पाटील
ऐक्य समूह
Friday, February 02, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: re4
5इस्लामपूर, दि.1: मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट असल्याने या बजेटकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात हे बजेट अपयशी ठरले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जनतेला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या प्रगतीचे, विकासवाढीसाठी नवे असे काही या बजेटमध्ये नाही. गुणच द्यायचे झाले तर 10 पैकी फार तर 3 किंवा 4 गुण देता येतील, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जयंत पाटील यांनी दिली आहे.
गेल्या वर्ष-दीड वर्षात हे सरकार फक्त मोठं-मोठ्या घोषणा
करते, मात्र कामे काहीच करत नाही, अशी देशातील लोकांची भावना बळकट होत चालली आहे. लोकांची ही भावना काहीशी
कमी करण्याची धडपड या बजेटमध्ये दिसते. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. वर्षाला 2 कोटी युवकांना नोकर्‍या देवू म्हणत त्यांनी युवकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकर्‍यांना शेतीमालास खर्चाच्या 150 टक्के हमीभाव देवू, ही घोषणा तर मोदी साहेबांनी 4
वर्षांपूर्वीच केली आहे.
या बजेटमध्ये तिचा पुनरुच्चार करताना किती तरतूद करणार हे ठोसपणे सांगू शकलेले नाहीत. देशातील 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे हेल्थ कव्हरेज देवू म्हणतात. मात्र ते कसे देणार याची वाच्यता कुठे केली आहे? मेक इन इंडियाचा किती मोठा डांगोरा पिटण्यात आला. मात्र आपल्या देशात यातून किती नवी गुंतवणूक आली याचा साधा उल्लेख करण्याचे तारतम्य ही मंडळी दाखवू शकलेले नाहीत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: