Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाडळोशीला विकासकामात झुकते माप देणार : आ. देसाई
ऐक्य समूह
Thursday, February 01, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: re6
5दौलतनगर, दि. 31 : अनेक वर्षापासून बारमाही रस्त्याची सोय नसलेल्या तावरेवाडी व मसुगडेवाडी या दोन्ही वाड्यांनाही तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून बारमाही रस्त्यासाठी आवश्यक असणारा निधी मंजूर करत दोन्ही रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे नेली आहेत. पाडळोशी ग्रामपंचायतीची सत्ता देसाई गटाकडे असताना या गावामध्ये व शेजारच्या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. परंतु अंतर्गत मतभेदामुळे थोड्याशा मतांनी ग्रामपंचायतीची सत्ता गेली असली तरी विकासकामांमध्ये राजकारण न करता सामान्य जनतेच्या गैरसोयी लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य दिले आहे. यापुढेही पाडळोशी गावाला व या गावच्या वाड्यांनाही विकासकामात असेच झुकते माप देणार असल्याचे प्रतिपादन आ. शंभूराज देसाई यांनी केले. आ. देसाई यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून आणलेल्या निधीतून करावयाच्या पाडळोशी ते मसुगडेवाडीकडे या रस्त्याचे भूमिपूजन पाडळोशी, ता. पाटण या ठिकाणी आ. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन अ‍ॅड. मिलिंद पाटील, कारखान्याचे व्हाई चेअरमन राजाराम पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य दत्तात्रय वेल्हाळ, डी. वाय पाटील, माजी संचालक बी. आर. पाटील, प्रकाश नेवगे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष व शंभूराज युवा संघटना अध्यक्ष भरत साळुंखे, उपाध्यक्ष अभिजित पाटील, शिवदौलत बँक संचालक चंद्रकांत पाटील, विजयसिंह पाटील, माजी संरपच सौ. जनाबाई सुतार, माजी उपसरपंच दत्तात्रय पाटील, भरत पाटील, विठ्ठलराव ढेरे, वसंत ढेरे, जयवंत पाटील, सदस्य
बापूराव चव्हाण, सौ. संगीता ढेरे, सौ. देवता गुरव, ज्ञानदेव पवार, शिवाजी पवार, नितीन पवार, पांडुरंग पवार, अनिल पवार, संतोष पवार, लक्ष्मण तावरे, मानसिंग तावरे, शंकर तावरे, नीलेश पाटील, लक्ष्मण बाबर, श्रीकांत सुतार, राजेंद्र
तावरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. बी. माने, शाखा अभियंता घुटे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
आमदार शंभूराज देसाई म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी गणपती भेटीदरम्यान मसुगडेवाडी व तावरेवाडी या पाडळोशी गावच्या वस्त्यांना जोडणार्‍या रस्त्यांची दुर्दशा पाहण्यास मिळाल्यानंतर तालुक्याचा आमदार झाल्यानंतर प्राधान्याने या दोन्ही वाड्यांना जोडणार्‍या रस्त्यांकरिता निधी मंजूर केला. तावरेवाडी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे तर मसुगडेवाडी गावाला जोडणार्‍या रस्त्याला पहिल्या टप्प्यात नारळवाडी पर्यंतचा रस्ता निधी उपलब्ध करून दिला. आज उर्वरित राहिलेल्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आपण केले आहे. आता हा रस्ता पूर्ण होईल. विकास-कामांच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आपण गत तीन वर्षात केले आहे. पाडळोशी गावाबरोबर तावरेवाडी व मसुगडेवाडी या वाड्यांमध्ये गत तीन वर्षात 1 कोटी 2 लक्ष रुपयांचा निधी देवून या गावाचा व वाड्यांचे प्रलंबित राहिलेले प्रश्‍न सोडविण्याचा आपण प्रयत्न केला आहे. पाणी पुरवठा योजनांकरिता 30 लाख रुपयांचा निधी मंजूर होत आहे. एवढी लोकांच्या मूलभूत गरजा असणारी विकासकामे आपण मार्गी लावली तरीही अंतर्गत मतभेदामुळे ग्रामपंचायतीची सत्ता विरोधकांच्या ताब्यात गेली. ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यातून गेली म्हणून विकासकामांच्याबाबतीत कसलेही राजकारण न करता येथील ग्रामस्थांच्या अडचणींना आपण प्राधान्यच देणार आहे. दादासाहेब सुतार यांनी आभार मानले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: