Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोक्सो कायद्यान्वये एकाला तीन वर्षाची शिक्षा,एक हजार दंड
ऐक्य समूह
Thursday, February 01, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 31 : अल्पवयीन मुलीला मध्यरात्री झोपेतून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍या  सत्यवान जगन्नाथ हगवणे  (वय 26, उचगाव, ता.वाई) याला पोक्सो कायद्यांतर्गत पहिले तदर्थ सत्रन्यायाधीश पी.यू.घुले यांनी 3 वर्षाची शिक्षा व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड  न दिल्यास त्याला आणखी 1 महिना साधी कैदही भोगावी लागणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या गुन्ह्यातील मुलगी 12 वर्षाची आहे. ही मुलगी दि. 25 मार्च 2016 रोजी झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास सत्यवान हगवणे हा तेथे गेला. मुलीला झोपेतून नेवून परिसरात आडबाजूला तिच्याशी लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न त्याने केला. या घटनेनंतर मुलगी जागी झाली व बचावासाठी तिने आरडाओरडा केला. ओरडण्याचा आवाज आल्यानंतर संशयित तेथून पळून गेला. त्यावेळी संशयिताला पळून जाताना कुटुंबीयांनी पाहिले. त्यानंतर या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे  (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी त्यावेळी दहा वर्षाची होती.  
याबाबत तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फौजदार प्रकाश खरात यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात दोन्ही पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सत्यवान हगवणे याला न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सरकारी सहायक वकील अ‍ॅड.नितीन मुके यांनी काम पाहिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: