Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुरुची राडा, सावकारी प्रकरणात नगरसेवक बाळू खंदारेला अटक
ऐक्य समूह
Thursday, February 01, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 31  : सुरुची राडा प्रकरण, खाजगी सावकारीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याला सातारा शहर पोलिसांनी बुधवारी रात्री सातार्‍यात अटक केली.  
याबाबत अधिक माहिती अशी, आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलण्यावरून  सुरुचीसमोर खासदार व आमदार गटात जोरदार राडा झाला. थेट फायरिंगसह जाळपोळ, तोडफोड झाल्यानंतर या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल झाले होते. या घटनेनंतर दोन्ही गटातील संशयित पसार झाले. यामध्ये बाळू खंदारेही पसार झाला होता.  सुरुची राडा प्रकरणातील दोन तक्रारींमध्ये बाळू खंदारे याचा संशयित आरोपी म्हणून सहभाग आहे. पोलीस सर्व संशयितांसह बाळू खंदारेचाही शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. दरम्यानच्या काळात बाळू खंदारेविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात सावकारीचाही गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी बाळू खंदारे सातार्‍यात सदरबझार येथील आरटीओ ऑफिसजवळ आला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ पोलिसांचे पथक तयार करून रात्री 7 च्या सुमारास सापळा लावला असता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: