Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुलाचे मित्र असल्याचे सांगून बुधवार पेठेत दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला
ऐक्य समूह
Wednesday, January 31, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: lo4
भरदिवसा प्रकार; भीतीचे वातावरण
5सातारा, दि. 30 : मुलाचे मित्र आहे, असे सांगून वृद्धेस चहा करायला लावून सोमवारी भरदिवसा बुधवार पेठेतून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे दागिने व रोकड लांबवली.
भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे बुधवार पेठेत भीतीचे वातावरण आहे.  या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
जोहरा शकील शेख यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जोहरा शेख काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरात त्यांच्या सासूबाई एकट्याच होत्या. दुपारी दीडच्या सुमारास दोन चोरटे शेख यांच्या घरात गेले.   
तुमच्या मुलाचे मित्र आहोत, अशी ओळख सांगून ते बोलत बसले. मध्येच त्यांनी चहाची मागणी केली. वृद्ध सासू चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. त्या ठिकाणी एक युवक त्यांच्याशी गप्पा मारत उभा राहिला. चहा पिऊन झाल्यानंतर दोघेही पसार झाले. साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोहरा शेख घरी परत आल्या. त्यावेळी त्यांना बाहेरच्या कपाटातील लॉकर तोडले गेल्याचे दिसले. त्यांनी कपाट उघडून खातरजमा केली असता दागिने व रोख रक्कम जागेवर नव्हती. 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: