Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

उपमहाराष्ट्र केसरी पै.किरण भगत यांचा सातारारोड ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार
ऐक्य समूह
Thursday, January 25, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: sp2
5सातारारोड, दि. 24 : आंतरराष्ट्रीय कुस्ती क्रीडा संकुल, पुणेचा मल्ल व काका पवार यांचा पट्टा मोही, ता. माण गावचे सुपुत्र 2017 चे उपमहाराष्ट्र केसरी, सातारा जिल्ह्याचा अभिमान पै. किरण  भगत यांचा सातारारोड-पाडळी येथील बस स्थानक चौकात आकर्षक स्मृतिचिन्ह, शाल,
श्रीफळ, पुष्पहार देऊन व भरजरी फेटा बांधून तरूण मंडळे व ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपमहाराष्ट्र केसरी पै. भगत म्हणाले, सातारा जिल्ह्यात माझे अनेक सत्कार झाले मात्र महाबली हनुमानाच्या स्वयंभू अस्तित्वाने पावन झालेल्या श्री क्षेत्र जरंडेश्‍वरच्या भूमीत झालेला हा सत्कार लाखमोलाचा आहे. सातारारोड-पाडळी गावास कुस्तीची ऐतिहासिक परंपरा असून या भूमीने मला दिलेल्या पाठबळाने मी भारावून गेलो आहे. येथील कुस्तीप्रेमी जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर मी यापुढेही अखंडपणे कार्यरत राहून कुस्ती क्षेत्रात यश मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कुस्तीप्रेमी असलेल्या या गावाने केलेल्या सत्काराने मी भारावून गेलो आहे. मल्लांना पाठबळ देण्याची येथील जनतेची भावना कौतुकास्पद आहे.
उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत यांचे फटाक्यांचे आतषबाजीत भव्य स्वागत करून ढोल, ताशा व वाद्यांच्या गजरात मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. युवकांनी पै. भगत यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी 2015 चे उपमहाराष्ट्र केसरी पै. विकास जाधव (करमाळा, जि. सोलापूर), पै. आकाश माने (भोसे), पै. प्रसन्न घाडगे, पै. सत्यजित फाळके (सातारारोड-पाडळी), मल्लखांबपटू रजत कवडे, पै. उदय शेळके (सोलापूर) व परिसरातील अनेक यशस्वी खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: