Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महिंद प्रकल्पातील बाधित शेतकर्‍यांचे उद्या आत्मदहन
ऐक्य समूह
Thursday, January 25, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: re6
5पाटण, दि. 24 : लघु पाटबंधारे तलावातील महिंद येथील बाधित शेतकर्‍यांना गेल्या दहा वर्षापासून पर्यायी जमिनी मिळाल्या नाहीत. नियमाप्रमाणे पुनर्वसन करण्यासठी प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हधिकारी कार्यालय, जिल्हा पुनर्वसन अधिकारी या ठिकाणी वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन देण्यात यावी तसेच इतर लाभ मिळवण्यासाठी पाठपुरावा केला, त्यासाठी मोर्चे, आंदोलने, उपोषणे, घंटानाद आंदोलने केली. तरीही प्रशासनाला बाधितांची दया आली नाही, आजतागायत आम्हाला कोणत्याही प्रकारच लाभ दिला नाही, या मागणीसाठी महिंद प्रकल्पातील बाधित 26 जानेवारी या प्रजासत्ताकदिनी पाटण प्रांत व तहसीलदार कार्यालयासमोर केव्हाही सामुदायिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा गौतम प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिंतामण यादव यांनी बाधित शेतकर्‍यांच्यावातीने निवेदनाद्वारे दिला आहे.
याचे निवेदन मुख्यमंत्री,
पोलीस अधीक्षक सातारा, जिल्हाधिकारी सातारा, अप्पर जिल्हधिकारी सातारा, विभागीय आयुक्त पुणे, प्रांत व तहसील कार्यालय पाटण, पोलीस निरीक्षक पाटण यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे, की लघु पाटबंधारे तलाव महिंद, ता, पाटण येथील सळवे गावातील 269 खातेदारांच्या जमिनी सन 1993-94 साली शासनाने संपादित केल्या आहेत. मात्र या प्रकल्पामुळे मागासवर्गीय तथा शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ज्या खातेदारानी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून प्रकल्पासाठी जमिनी दिल्या त्याच खातेदारांना जमिनी देण्यास प्रशासन आजही टाळाटाळ
करत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून खातेदारांना पर्यायी जमिनी द्याव्यात व इतर न्यायिक मागण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गौतम प्रतिष्ठानच्या नतृत्वाखाली अनेकदा मोर्चे, आंदोलने
करून देखील आजही बाधितांना पर्यायी जमिनी मिळाल्या
नाहीत. अधिकार्‍यांना घेराव, सहविचार सभा, जिल्हाधिकारी, सातारा यांच्यासोबत बैठका, विचारविनिमय करून देखील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही, त्यामुळे आता आम्हाला आत्मदहनाशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही, असा इशारा देण्यात आला आहे. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: