Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निवृत्त उपजिल्हाधिकार्‍याची फसवणूक
ऐक्य समूह
Thursday, January 11, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: lo3
करणार्‍या पाच जणांवर गुन्हा
5सातारा, दि. 10 : अपारंपरिक ऊर्जा वापरण्यासाठी नेट मीटरिंग बसवून देवून शासकीय अनुदानही मिळवून देतो, असे आमिष दाखवून निवृत्त उपजिल्हाधिकार्‍याची 2 लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार देण्यासाठी जाताना फिर्यादीला संशयितांनी जीवे मारण्याचीधमकी दिल्यानेखळबळ उडाली आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांची रमाकांत श्रीरंग कात्रे (एमआयडीसी), आनंदा हरीबा संकपाळ (मु.पो.वेंगळे, ता. महाबळेश्‍वर), प्रमोद हणमंत मुळीक (रा.अपशिंगे, ता. कोरेगाव), गणेश दिलीप पाचंगे (केसरकर कॉलनी) व अजिंक्य प्रताप भोसले (आष्टे, ता.सातारा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी निवृत्त उपजिल्हाधिकारी सदाशिव मारुती जाधव (वय 75, रा.विलासपूर, ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार सदाशिव जाधव व रमाकांत कात्रे यांची ओळख आहे. कात्रे याने तक्रारदार यांना नेट मीटरिंग बसवून घेण्याची गळ घातली व त्यासाठी ऊर्जा किरणसोलर सिस्टीम ही त्याची स्वत:चीभागीदारीतील कंपनी असल्याचे सांगितले.   
त्यानुसार 1 लाख 95 हजार रुपये सर्व खर्च येणार असून त्यावर 55 हजार रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो, असेही सांगितले.  या प्रक्रियेवेळी इतर संशयितही त्यामध्ये सहभागी होते. तक्रारदार जाधव यांनी संशयितांना सुरुवातीला 1 लाख 50 व त्यानंतर 50 हजार रुपयांचा धनादेश दिला. पैसे दिल्यानंतरही संशयितांनी काम केले नाही. शासकीय अनुदानाबाबत विचारणा केल्यानंतरही त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर संशयित संपर्क करण्यास टाळाटाळ करत असल्याने व फसवणूक झाल्याने तक्रारदार सदाशिव जाधव हे दि. 27 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात असताना कात्रे याने जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर दि. 9 रोजी तक्रारदार यांनी संशयितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: