Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अज्ञात वाहनाच्या धडकेत कोरेगावची महिला ठार
ऐक्य समूह
Wednesday, January 03, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 2 : तारगाव-वाठार रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोहितेवाडी, ता. कोरेगाव येथील एक महिला ठार झाली. ठार झालेल्या महिलेचे सुनंदा प्रमोद लोखंडे (वय 45, रा. मोहितेवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा)  असे नाव आहे. जखमी अवस्थेतच त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, तारगाव-वाठार रस्त्यावर असणार्‍या सुकेरीच्या ओढा वळणावरुन सुनंदा लोखंडे चालत निघाल्या होत्या. यावेळी त्यांना अज्ञात वाहनाने धडकदिली. यामध्ये त्या गंभीर जखमीझाल्या. दरम्यान, ही माहितीसमजल्यानंतर सुनंदा यांना तत्काळसंभाजी तुकाराम घाग आणि सूरज सुनील घाग या दोघांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: