Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तडीपार गुंडाचे शाहूपुरी पोलीस ठाण्यातून पलायन
vasudeo kulkarni
Tuesday, January 02, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 1 : तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी पकडलेल्या कैलास नथू गायकवाड (रा. नामदेववाडी झोपडपट्टी, प्रतापगंज पेठ) याने सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यातून पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथके पाठवण्यात आली आहेत.
कैलास गायकवाड याच्यावर घरफोडी, चोरी, दरोडा व अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याची टोळी कार्यरत असल्याने त्याला व दोन साथीदारांना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एक वर्षासाठी तडीपार केले आहे. तडीपार करूनही तो सातारा शहरात पोलीस ठाण्यातून पलायन
फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी त्याला पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच गायकवाडने पोलीस ठाण्यातून पलायन केले. हे लक्षात येताच पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यास भेट दिली. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, चंद्रकांत बेदरे व कर्मचार्‍यांकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर गायकवाडचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्याचे आदेश डॉ. धरणे यांनी दिले. शाहूपुरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: