Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हाफिजच्या संघटनांना निधी गोळा करण्यावर बंदी
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: na3
पाकिस्तान सरकारचा निर्णय
5इस्लामाबाद, दि. 1(वृत्तसंस्था) : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या ‘जमात-उद-दावा’, ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘फलाह-ए-इन्सानियत फौंडेशन’ या संघटनांना धर्मादाय कारणासाठी निधी गोळा करण्यावर पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. सईद याच्या संघटनांबरोबरच अन्य काही दहशतवादी संघटनांवरही पाकिस्तानने अशाच प्रकारची बंदीघातली आहे.
पाकिस्तानी अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सिक्युरिटीज् अँड एक्स्चेंज कमिशन (एसईसीपी) या आर्थिक नियंत्रण संस्थेने 19 डिसेंबर रोजी या बंदीचा आदेश काढल्याचे सूत्रांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या सर्व संघटनांना धर्मादाय कारणासाठी निधी गोळा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास जबर दंड ठोठावला जाईल, असे ‘एसईसीपी’ने म्हटले आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास 10 दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावण्याचे पाकिस्तान सरकारने निश्‍चित केले आहे.
वेगळ्या नावाच्या संघटना काढून त्या माध्यमातून धर्मादाय कारणासाठी निधी गोळा करण्याचा हाफिज सईद व अन्य दहशतवाद्यांचा डाव आहे. मात्र, सईदसह या दहशतवाद्यांच्या धर्मादाय संस्था आणि मालमत्तांवर टाच आणण्याचा पाकिस्तानी सरकारचा इरादा आहे.
याबाबतचा तपशील 19 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या गुप्त आदेशात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: