Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अंतवडी येथे मोटरसायकलच्या धडकेत सायकलस्वार ठार
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: re2
5मसूर, दि. 1 : मसूर-शामगाव जाणार्‍या रस्त्यावर अंतवडी गावच्या हद्दीत वाघजाई नावाच्या शिवाराजवळ रस्त्याकडेला सायकल घेऊन थांबलेल्या सुभाष ख्यामू शिंदे (वय 50, रा. अंतवडी, ता. कराड) यांना दुचाकीने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना रविवारी (दि. 31 डिसेंबर) रात्री 9 च्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळा-लेली माहिती अशी, सुभाष शिंदे हे मसूर-शामगाव रस्त्यावर सायकल घेऊन कडेला थांबले होते. त्यावेळी मसूर बाजूकडून भरधाव वेगात जाणार्‍या बजाज डिस्कव्हर मोटरसायकलने धडक दिल्याने शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारा-साठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी मोटरसायकलस्वार युवराज विठ्ठल मंडले (रा. भिकवडे बुद्रुक, ता. खानापूर, जि. सांगली) याच्यावर मसूर पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल झाला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: