Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारत-पाक क्रिकेट मालिका अशक्य सुषमा स्वराज यांनी ठणकावले
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेट मालिका त्रयस्थ ठिकाणीही होणार नसल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ठणकावले आहे.
परराष्ट्र मंत्रालयातील अधि-कार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत भारत-पाक मालिकेची शक्यता धुडकावून लावण्यात आल्याने भारत-पाक द्विपक्षीय क्रिकेट संबंधांची आशा पुन्हा एकदा मावळली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून बीसीसीआयकडे द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबत सतत विचारणा करण्यात येत आहे. मात्र, ही मालिका सरकारच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे बीसीसीआयने वारंवार स्पष्ट केले आहे.
याबाबत स्वराज म्हणाल्या, दोन्ही देशांमधील सध्याचे संबंध पाहता त्रयस्थ ठिकाणीही क्रिकेट मालिका अशक्य आहे. एका बाजूला दहशतवादी हल्ले आणि जम्मू-काश्मीर सीमेवर गोळीबार सुरू असताना पाकिस्तान क्रिकेट मंडळ द्विपक्षीय सामने खेळण्याची अपेक्षा कशी करू शकते? मानवतेच्या दृष्टिकोनातून दोन्ही सरकारांनी आपल्या कैदेत असलेल्या इतर देशांच्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही पाकिस्तानी नागरिकांना भारतात उपचार घेण्यासाठी तत्काळ वैद्यकीय व्हिसाही दिला होता. मात्र, पाकिस्तान सीमेपलीकडून कुरापती काढतच आहे. हे वातावरण क्रिकेट मालिका खेळण्यासाठी योग्य नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: