Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चेक चोरून पावणेदोन लाख रुपये
ऐक्य समूह
Monday, January 01, 2018 AT 11:45 AM (IST)
Tags: lo3
बँकेतून काढणार्‍या दोघांना अटक
5सातारा, दि. 31 : येथील एका वर्कशॉपमधील दोन कामगारांनी मालकाचे चार चेक चोरुन आणि त्यावर बोगस सह्या करुन एक लाख 60 हजार रुपये बँकेतून काढून फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. अमोल कृष्णा सावंत (वय 24, रा. लिंब) व विद्याधर सूर्यकांत शहा (वय 21, रा. वर्णे, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणपत जाधव (रा. सदरबझार) यांच्या वर्कशॉपमध्ये अमोल सावंत व विद्याधर शहा हे ऑपरेटर म्हणून नोकरीस आहेत. जाधव यांनी वर्कशॉपमध्ये चेकबुक ठेवले होते. त्यातील चार चेक संशयितांनी चोरुन त्यावर जाधव यांच्या बोगस सह्या केल्या. हे चेक वटवून त्यांनी 1 लाख 60 हजार रुपये बँकेतून काढले. या प्रकरणी जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही संशयितांना पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. हवालदार विजय शिर्के, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, नीलेश काटकर यांनी ही कारवाई केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: