Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चुलत मामाकडून गतिमंद भाचीवर बलात्कार
ऐक्य समूह
Saturday, December 30, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: re4
5औंध, दि. 29 :  खटाव तालुक्यातील एका गावात 35 वर्षीय गतिमंद महिलेवर चुलत मामानेच बलात्कार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चुलत मामास औंध पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी, की पीडित मुलीचे कुटुंब मुंबई येथे राहत आहे. या मुलीचे आजोळ खटाव तालुक्यात आहे. शाळांना सुट्टी असल्याने सर्व कुटुंबीय दि.23 रोजी गावी आले होते. दि. 25 रोजी पीडित मुलीची वयस्कर मामी पाटण येथे राहत असल्याने त्यांना भेटण्यासाठी मुलीचे कुटुंबीय पाटणला गेले होते. पीडित मुलीस सर्दीचा त्रास होत असल्याने तिला तिचा चुलत मामा हणमंत सुरेश जाधव यांच्याकडे ठेवून  बाकीचे पाटणला गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी आंघोळ घालताना मुलीने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. दि. 25 रोजी सकाळी 11 ते रात्री 9.30 च्या दरम्यान पीडित मुलीचा चुलत मामा हणमंत सुरेश जाधव (वय 38) याने बलात्कार केल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिली आहे. सपोनि. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुधीर येवले तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: