Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाठार येथे अपघातात वडील ठार, मुलगा गंभीर
ऐक्य समूह
Saturday, December 30, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि.29 : पुणे-बंगलोर महामार्गावर दुचाकीवरून निघालेल्या आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील पिता-पुत्राची दुचाकी व कारमध्ये धडक होवून झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली.
रघुनाथ एकनाथ जाधव (वय 47 वर्षे) असे ठार झालेल्यांचे व अंकुर रघुनाथ जाधव (वय 21 वर्षे) असे जखमीचे नाव आहे. जखमीवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की आगळगाव (ता. कवठे-महांकाळ) येथील रघुनाथ एकनाथ जाधव व त्यांचा मुलगा अंकुर जाधव हे दोघे जण त्यांच्याकडील युनिकॉर्न मोटरसायकलवरून पुणे येथून शुक्रवारी सकाळी गावी आगळगावकडे येत होते. कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत पुणे-बंगलोर महामार्गावर वाठार हायस्कूलसमोर सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्या मोटरसायकलची व कारची धडक झाली. अपघातामुळे कारचे पाठीमागील डाव्या बाजूचे इंडिकेटर व टायर फुटला तर दुचाकीस्वार अंकुर व त्याचे वडील रघुनाथ जाधव हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रघुनाथ जाधव यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कराड ते कोल्हापूर मार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग देखभाल विभाग पथक व वाठार येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोलीस येईपर्यंत वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: