Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उड्डाणपुलाची भेग म्हणजे ‘एक्स्पान्शन
ऐक्य समूह
Friday, December 29, 2017 AT 11:02 AM (IST)
Tags: lo1
गॅप’ : राजमार्ग अधिकार्‍यांचा दावा
धोका नसल्याची माहिती; वाहतूक मात्र सेवारस्त्यानेच
5सातारा, दि. 28 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवराज चौकात असलेल्या उड्डाणपुलाची भेग म्हणजे एक्स्पान्शन गॅप आहे. पुलास कोणताही धोका नाही, अशी माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र एकीकडे पुलाला धोका नसल्याचे स्पष्टीकरण दिले गेले असले तरी महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्यानेच सुरु होती. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
महामार्गावरील शिवराज चौकाच्या उड्डाण पुलाखालून जाणार्‍या वाहनचालकांच्या अंगावर माती, खडे पडल्याने पुलाचा काही भाग कोसळण्याची चर्चा सुरु झाली होती. वाहतूक पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी पाहणी करुन वाहतूक वळवली होती. 
गुरुवारी राजमार्ग प्राधिकरणाच्या पुणे येथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करुन ही भेग म्हणजे एक्स्पान्शन गॅप आहे, असे सांगितले. यावेळी राज्य शासनाने जुन्या पुलांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीजचे प्रतिनिधी आर. व्ही. सूर्यवंशी उपस्थित होते. दोन पुलांमध्ये 20 ते 25 मिलीमीटरचा गॅप ठेवावा लागतो. काही कारणाने धक्का लागल्याने गॅपच्या भेगेवरील सिमेंटचा पोपडा निघाल्याने त्यातून माती खाली पडली. माती खाली पडल्याने वेगवेगळ्या चर्चा झाल्या आहेत, असे अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: