Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भोंदूबाबा हैदरअली शेखला तपासासाठी सातार्‍यात आणले
ऐक्य समूह
Thursday, December 07, 2017 AT 11:17 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 6 : पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर भोंदूबाबा हैदरअली शेख (रा.गुरुवार पेठ, सातारा) याला बुधवारी तपासासाठी सातार्‍यात आणले होते. तपासामध्ये नेमके काय निष्पन्न झाले हे समजू शकले नाही. मात्र तपासा दरम्यान आणखी फसवणुकीची प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.
 पुणे येथे दोन महिलांवर अत्याचार केल्या प्रकरणी खडक, पुणे पोलीस ठाण्यात भोंदूबाबावर गुन्हा दाखल झाला आहे. दैवी शक्ती असल्याचे सांगून भोंदूबाबा हैदरआली याने हे गुन्हे केले आहेत. त्याशिवाय संशयिताने आजारावर उपचार करतो, असे खोटे सांगून तक्रारदार कुटुंबीयांकडून वेळोवेळी 8 लाख रुपये, गाड्या व फ्लॅट उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार कुटुंबीयातील आजारी व्यक्ती हा उच्च शिक्षित असल्याचे समोर आले असून पीडित महिला मूळची सातारची आहे.
सातारा येथे तपासासाठी बुधवारीसंशयिताला आणले होते. तपासावेळीसंशयिताच्या घरी, कार्यालयात पोलिसांनी तपास केला असून  ते परत पुण्याला गेले आहेत. संशयितावर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: