Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाढदिवसाचा फलक फाडल्याच्या कारणावरून युवकांच्या दोन गटात राडा
ऐक्य समूह
Wednesday, December 06, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: re4
5कराड, दि. 5 : कराड तालुक्यातील जुळेवाडी येथे एकाच्या वाढदिवसानिमित्तलावण्यात आलेला फलक फाडल्याच्या कारणावरुन युवकांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. एकमेकांवर दगडफेक करण्याचा प्रकार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी, जुळेवाडी, ता. कराड येथे एका युवकाच्या वाढदिवसानिमित्तशुभेच्छा फलक लावण्यात आला होता. काही अज्ञातांनी हा फलक फाडल्याचे मंगळवारी दुपारी काही युवकांच्या निदर्शनास आल्याने फलक लावणार्‍या युवकाचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी इतर मित्रांना याची कल्पना दिली असता किल्लेमच्छिंद्रगड व रेठरे येथील युवकही संतापले. दुपारी युवकांचे दोन गट आमने-सामने आले असता त्यांच्यात जोरदार वाद होऊन एकमेकांना धक्काबुक्की झाली. 
यावेळी काही युवकांनी एकमेकांच्यादिशेने दगड भिरकावल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच रेठरे बुद्रुक पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत युवकांच्या जमावाला पांगवले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झालेली नव्हती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: