Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘सुरुची’ राडा प्रकरणात खासदार गटाच्या जामीन अर्जावर 14 डिसेंबरला सुनावणी
ऐक्य समूह
Wednesday, December 06, 2017 AT 10:57 AM (IST)
Tags: lo2
अमोल मोहिते यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
5सातारा, दि. 5 : ‘सुरुची’ समोर झालेल्या राड्या प्रकरणात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले गटाच्या कार्यकर्त्यांच्या केलेल्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी दि. 14 डिसेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, आ.श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे नगरसेवक अमोल मोहिते यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
सुरुचीसमोर आ. शिवेंद्रसिंहराजे आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या गटात राडा झाला होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.
दोन्ही गटातर्फे न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आले आहेत. खा. उदयनराजे भोसले गटाच्या बाळासाहेब ढेकणे, इम्तियाज बागवान, विक्रम शेंडे, शेखर चव्हाण, केदार राजेशिर्के, विशाल ढाणे, किरण कुर्‍हाडे यांनी जिल्हा न्यायालयात कायमस्वरुपी जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. मंगळवारी याप्रकरणी सुनावणी होती.   
पण, या कार्यकर्त्यांच्या वकिलांनी सुनावणीसाठी पुढील तारीख मिळावी, असा अर्ज न्यायालयात दिला होता. त्यामुळे दि. 14 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहेे. खा. उदयनराजे गटातर्फे अ‍ॅड. ताहेर मणेर काम पाहत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: