Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विवाहितेवरील अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Wednesday, December 06, 2017 AT 11:05 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 5 : विवाहित महिलेचे अपहरण करुन तिच्यावर राज्यात तसेच राज्याबाहेर नेवून वेळोवेळी अत्याचार केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी महिलेने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन इक्बाल घाशी नावाच्या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी इकबाल घाशी याच्यावर उंब्रज पोलिसात गुन्हा दाखल आहे. संबंधित महिला दि. 22 रोजी आई व बहिणीसमवेत विद्यानगर-सैदापूर येथील नातेवाईकांकडे निघाली होती. त्यानंतर ती एकटीच घरी परतत असताना इकबाल घाशी याने तिला अडवले. तू माझ्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात बोलायचे असल्याचे सांगून त्याने महिलेस कराडच्या प्रांताधिकारी कार्यालयाजवळ बोलवले. तेथून त्याने महिलेस नांदलापूर येथे वकीलांशी बोलायचे असल्याचे सांगून तिकडे नेले. नांदलापूरात गेल्यावर फरशी भरलेल्या ट्रकमधून महिलेस कोल्हापूर, बेळगावमार्गे कोचीनला नेले. कोचीन येथे एका हॉटेलमध्ये नेऊन महिलेस मारहाण करत दमदाटी करुन अत्याचार केला. त्यानंतर त्या महिलेस संशयिताने कराडमधील एका लॉजमध्ये नेले. तेथे महिलेस बांधून ठेवत तुला जीवंत ठेवणार नाही. तू माझ्याशी लग्न करायचे, अशी दमदाटी करत गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. तेथून खासगी आरामबसने त्या महिलेस मुंबईत नेले. तेथून पुन्हा एका बसमध्ये बसवून सोडून दिले. अपहरण झालेल्या महिलेने एका व्यक्तीच्या मोबाईलवरुन बहिणीशी संपर्क साधल्यावर हा प्रकार उघडीस आला. संबधित महिलेने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: