Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गृहप्रकल्प असल्याचे सांगून फसवणूक करणार्‍या तिघांवर गुन्हा
ऐक्य समूह
Tuesday, December 05, 2017 AT 11:38 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 4 :  वाढे, ता. सातारा येथे गृहप्रकल्प असल्याचे सांगून 1 लाख 60 हजार रुपयांची रक्कम घेवून माजी सैनिकाची फसवणूक करणार्‍या मुंबई येथील सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भीम फाउंडेशन गृहनिर्माण संस्थेच्या तीन पदाधिकार्‍यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची मधुकर सूर्यवंशी, सचिन लोंढे व प्रमोद पॉल (पूर्ण नाव, वय, पत्ता माहीत नाही) अशी नावे आहेत.
या प्रकरणी शांताराम निवृत्ती बारशिंगे (वय 68, रा.सदरबझार, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भीम फाउंडेशन गृहनिर्माण संस्थेच्यावतीने सातार्‍यात गृहप्रकल्प असल्याचे 2013 साली सांगण्यात आले होते. 
तक्रारदार यांना घराची गरज असल्याने अ‍ॅडव्हान्स म्हणून 1 लाख 60 हजार रुपये भरले. रक्कम भरल्यानंतर मात्र काही कालावधीनंतर संशयित घर बांधेना व रक्कमही देत नव्हते. दरम्यान, संशयितांनी अनेक ठिकाणी अशा पद्धतीने फसवणूक केली असल्याचे समजल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदारांप्रमाणे आणखी काही जणांची सातार्‍यात फसवणूक झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: