Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बलात्कार प्रकरणातील संशयित स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर
ऐक्य समूह
Saturday, December 02, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: re2
5पिंपोडे बुद्रुक, दि. 1 : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील संशयित श्रीकांत जालिंदर शिंदे हा आज स्वत: वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात हजर झाला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित मुलगी आपल्या घरात झोपलेली असताना संशयित पहाटे पाचच्या सुमारास दरवाजाच्या फटीतून हात घालून, कडी काढून पीडित मुलीच्या घरात घुसला. यावेळी पीडित मुलगी झोपलेली असताना संशयित श्रीकांत शिंदे तिच्याशी लैंगिक चाळे करू लागला. तिला जीवे मारण्याची धमकी देवून त्याने तिच्यावर बलात्कार केला.
मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या खोलीत झोपलेले तिचे आई-वडील जागे झाले. त्यानंतर संशयित पळून गेला. संशयितावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो फरार झाला होता. 
घटनेच्या दोन दिवसानंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता तो वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी दिली. श्रीकांत शिंदेला सातारा येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: