Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बापानेच केला मुलीवर बलात्कार
ऐक्य समूह
Saturday, December 02, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 1 : तारळे परिसरात एक नराधम बापच स्वत:च्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून बलात्कार करत असल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत पीडित मुलीने तारळे पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिल्यानंतर उंब्रज पोलिसांनी नराधमावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील तारळे भागातील एका गावातील 48 वर्षीय नराधम गेल्या दोन वर्षांपासून स्वत:च्या 22 वर्षीय मुलीला शिवीगाळ, दमदाटी करून तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करत होता.
याबाबत पीडित मुलीने तक्रार दिल्याने नराधम बापावर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दि.26 नोव्हेंबरपर्यंत हा नराधम मुलीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करत होता. या घटनेमुळे तारळे परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. के. आवळे तपास करत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: