Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अजिंक्यतारा किल्ल्यावर सेल्फी काढताना पडून युवक गंभीर जखमी
ऐक्य समूह
Saturday, December 02, 2017 AT 11:16 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 1 : अजिंक्यतारा किल्ल्यावर आपल्या मित्रांसोबत फिरायला गेलेल्या करंजे येथील युवकाला तेथे सेल्फी काढण्याची हौस चांगलीच महागात पडली आहे. किल्ल्यावरील  एका खडकावर उभा राहून सेल्फी काढताना पायातील चप्पल घसरल्याने हा युवक खाली पडून गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी युवकाचे अनिकेत विठ्ठल शिरपे (वय 22, रा. करंजे पेठ, सातारा) असे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातार्‍यातील एका महाविद्यालयात अनिकेत शिरपे शिकत आहे.  ईदची सुट्टी असल्याने शुक्रवारी दुपारी तो आपल्या काही मित्रांसमवेत अजिंक्यतारा किल्ला परिसरात गेला होता. तेथे एका दगडावर अनिकेत उभा राहून सेल्फी घेत होता. त्यावेळी त्याच्या पायातील चप्पल घसरली आणि तो धडपडत खाली पडला.
ही घटना त्याच्या मित्रांच्या समोरच घडल्यामुळे त्याला त्याच्या मित्रांनी तत्काळ बाहेर काढले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मित्रांनी त्याला तत्काळ उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: