Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाळू चोरीप्रकरणी पिंपरे बुद्रुकच्या एकावर गुन्हा, पोकलॅन जप्त
ऐक्य समूह
Saturday, December 02, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: re4
5लोणंद, दि. 1 : पाडेगाव, ता. फलटण गावाच्या हद्दीतील सरदेच्या ओढ्यातील सुमारे तीस ब्रास गौण खनिज वाळू विनापरवाना पोकलॅनद्वारे काढून, चोरी करून नेल्या प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये विक्रम धायगुडे (रा.पिंपरे बुद्रुक, ता. खंडाळा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोकलॅन जप्त करण्यात आला आहे.
फलटण व खंडाळा तालुक्याच्या सीमेच्या मधून वाहत असणार्‍या सरहद्देच्या ओढ्यातून मोठ्या प्रमाणावर गौण खनिज वाळूची पोक लॅनच्या सहाय्याने उत्खनन करून चोरी केली जात होती. या ठिकाणी फलटण महसूल खात्याच्या भरारी पथकाने छापा टाकला असता पाडेगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील शामराव चव्हाण यांच्या शेतालगतच्या ओढ्यातील वाळू पोकलॅनच्या सहाय्याने काढण्यात आली होती. ही वाळूचोरी खंडाळा तालुक्याच्या हद्दीत असल्याने फलटणच्या महसूल विभागाने खंडाळा महसूल विभागाला माहिती दिल्यानंतर खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव, मंडलाधिकारी विजयकुमार बोबडे, तलाठी श्रीकांत इटलोट यांनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. त्यामध्ये तीस ब्रास गौण खनिज वाळू, पोकलॅनच्या सहाय्याने चोरून नेली होती. पथकाने छापा टाकल्यानंतर पोकलॅन चालक पळून गेला होता.
खंडाळा महसूल विभागाकडून हा पोकलॅन लोणंद पोलीस स्टेशनला नेत असताना त्याची चेन तुटली. त्यामुळे ती चेन पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली. या प्रकरणी विक्रम धायगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून याबाबतची फिर्याद तलाठी श्रीकांत इटलोट यांनी दिली आहे. सपोनि. सोमनाथ लांडे तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: