Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महिलेचे दीड लाखाचे दागिने हिसकावले
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: re2
कराड येथे वाखाण रोड परिसरातील घटना
5कराड, दि. 30 : येथील वाखाण रोड परिसरात मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी चालत निघालेल्या मंगल सतीश पोरे (वय 49, रा. रुक्मिणी गार्डन) या शिक्षिकेच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने हिसकावूनघेऊन पोबारा केल्याची घटना गुरुवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोरे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आदर्श प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मंगल पोरे या रुक्मिणी गार्डन येथून रोज शाळेपर्यंत चालत जातात. गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या होत्या. शाळा सुटल्यानंतर त्या चालत घरी निघाल्या होत्या. दुपारी 1.45 च्या सुमारास त्या वाखाण रोड येथे जयवंतराव पाटील यांच्या घरासमोर आल्या असता समोरून काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या एकाने पोरे यांच्या  गळ्यातील गंठण हिसकावून घेतले. चोरट्यांनी भरधाव वेगात पोबारा केला. घटनास्थळावरील नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे सापडले नाहीत. पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: