Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यंदा थंडीचा कडाका वाढणार
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : देशात यंदा थंडीचा कडाका गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मात्र, सरासरीच्या तुलनेत यंदाचा हिवाळा थोडा उबदार असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी 2018 या थंडीच्या मोसमात देशभरात कमाल आणि किमान तापमान थोडे अधिक असेल. मात्र, अनेक उपविभागांमध्ये थंडीच्या मोसमातील किमान तापमान गेल्या वर्षीपेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे सरसंचालक के. जी. रमेश यांनी वर्तविला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: