Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास 4 वर्षे सक्तमजुरी
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 30 : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या संतोष उर्फ बाळू चंद्रकांत सोनावणे (वय 30, रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा) याला पहिले तदर्थ जिल्हा व सत्रन्यायाधीश पी. व्ही. घुले यांनी 4 वर्ष सक्तमजुरीची आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न दिल्यास आणखी 3 महिने साध्या कैदेची शिक्षाही भोगावी लागणार आहे.
 दरम्यान, घटनेनंतर दोन वर्षात याचा निकाला लागला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, दि. 1 नोव्हेंबर 2015 रोजी आठ वर्षीय पीडित मुलगी सायंकाळी खेळत होती. त्यावेळी संशयित बाळू सोनावणे याने मुलीला बोलावले आणि तिचा विनयभंग करुन लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन तिच्याशी केले. काही वेळानंतर ही घटना मुलीच्या कुटुंबीयांना समजली. त्यानंतर त्यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली.
शिरवळ पोलीस ठाण्याचे फौजदार जी. जी. बोबडे यांनी घटनेचा तपास केल्यानंतर संशयिताविरुध्द जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायालयात बचाव व सरकार पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधीशांनी बाळू सोनावणे याला शिक्षा ठोठावली. घटनेनंतर अवघ्या दोन वर्षात खटल्याचा निकाल लागला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: