Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वर्ये येथे भीषण अपघातात युवक ठार
ऐक्य समूह
Thursday, November 30, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 29 : वर्ये, ता.सातारा येथे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास एस.टी. व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार निशाद रवींद्र खुडे (वय 28, रा.रविवार पेठ) हा युवक जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटवण्याची प्रक्रिया राबवल्यानंतर तो निशाद खुडे असल्याचे समोर आले. कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिल्यानंतर रुग्णालयात त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटूनटाकणारा होता.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी,  पुणे येथे कंपनीमध्ये निशाद खुडे कामाला आहे. बुधवारी रात्री शिरवळहून तो साताराकडे दुचाकीवरून येत होता. रात्री अकराच्या सुमारास तो वर्ये गावचे हद्दीत आला होता. त्याचवेळी सातारा आगारातून सातारा-बोरिवली ही एस.टी. मुंबईकडे निघाली होती. दोन्ही वाहने समोरासमोर आल्यानंतर अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की निशाद गंभीर जखमी झाला व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघाताच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी गेले. मात्र तो जागीच ठार झाला. त्यामुळे त्यालाउपचारास हलवण्याची इच्छा असूनही कोणाला, काहीही करता आले नाही. ग्रामस्थांनी घटनास्थळाची स्थिती पाहून हळहळ व्यक्त केली. या घटनेची नोंद तालुका पेालीस ठाण्यात दाखल झाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: