Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गडचिरोलीत सीआरपीएफचा जवान शहीद
ऐक्य समूह
Tuesday, November 28, 2017 AT 11:39 AM (IST)
Tags: mn3
नक्षलवादी हल्ल्यात दोन जवान जखमी
5गडचिरोली, दि. 27 (वृत्तसंस्था) : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती भागात रविवारी रात्री नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान मंजुनाथ जख्खनवार हे शहीद झाले तर अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. ही चकमक सायंकाळी 5.40 वाजता सुरू झाली. त्यानंतर रात्री 8 वाजता आणखी एक चकमक झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
राज्य पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांचे संयुक्त पथक रविवारी सायंकाळी एका मोहिमेवर असताना  गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती भागातील धानोरा गावानजीक माओवादी आणि सुरक्षा दलांची चकमक झाली. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 113 व्या बटालियनचे कॉन्स्टेबल मंजुनाथ जख्खनवार हे शहीद झाले तर अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. मंजुनाथ हे कर्नाटकातील धारवाडचे रहिवासी होते. या चकमकीनंतर घटनास्थळी जादा कुमक पाठवण्यात आली. या चकमकीत काही नक्षलवादीही ठार झाल्याचा दावा सुरक्षा दलांच्या सूत्रांनी केला आहे. मात्र, त्याला पुष्टी मिळू शकली नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: