Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अत्यावश्यक 50 औषधांच्या किंमतींवर मर्यादा
ऐक्य समूह
Saturday, November 25, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: na5
5नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) : कर्करोग, वेदना, हृदयविकार, त्वचेच्या समस्या आदी आजारांवरील औषधांसह 51 अत्यावश्यक औषधांच्या किमतींवर राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (एपीपीए) मर्यादा घातल्या आहेत. या औषधांच्या किरकोळ विक्री किमतीत सहा ते 53 टक्के कपात करण्यात आली आहे.
या संदर्भात ‘एनपीपीए’ने स्वतंत्र अधिसूचना जारी केली आहे. 13 अत्यावश्यक औषधांच्या कमाल किमती निश्‍चित करण्यात आल्या असून 15 औषधांच्या किमतींमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 23 अत्यावश्यक औषधांच्या किरकोळ किमतीही निश्‍चित करण्यात आल्या आहेत, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. मोठे आतडे, गुद्द्वार यांच्या कर्करोगावरील ऑक्झॅलिप्लॅटिन (100 एमजी इंजेक्शन), मेंदूदाह आणि गोवर यावरील लस यांच्या कमाल किमती निश्‍चित करण्यात आल्या आहेत. अ‍ॅनास्थेटिक सेव्होफ्ल्युरेन, फायटोमेनाडिओन (व्हिटॅमिन के1) आणि क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लसीच्या कमाल किमतींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे या अत्यावश्यक औषधांच्या किमती सहा ते 53 टक्क्यांनी कमी होणार आहेत. ‘एनपीपीए’ने औषधे (किंमत नियंत्रण) आदेश (डीपीसीओ) 2013 अन्वये परिशिष्ट 1 मध्ये समाविष्ट असलेल्या औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणले आहे.
1997 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘एनपीपीए’वर औषध उत्पादनांच्या किमती निश्‍चित करणे किंवा सुधारणा करणे, डीपीसीओमधील तरतुदींची अंमलबजावणी करणे आणि नियंत्रित व अनियंत्रित औषधांच्या किमतींवर देखरेख करणे, अशा जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत.  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: