Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आजपासून पश्‍चिम महाराष्ट्र दौर्‍यावर
ऐक्य समूह
Friday, November 24, 2017 AT 11:04 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 23 (प्रतिनिधी) : काँग्रेस वराष्ट्रवादी काँग्रेस विदर्भ पिंजून काढत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून स्वतंत्रपणे पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर जात आहेत. उद्धव ठाकरे हे या दौर्‍यात चार सभा घेणार आहेत.
विरोधी पक्षांनी सरकारविरुद्ध ‘हल्लाबोल’ आंदोलन करून टीकेची धार वाढवली असताना सत्तेत बसलेल्या भाजप-शिवसेनेनेही निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून स्वतंत्रपणे पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर जात आहेत. उद्धव ठाकरे 24, 25 व 26 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. चंदगड तालुक्यातून दौर्‍याला सुरुवात होईल. शेतकरी व व्यापार्‍यांशी संवाद साधताना गडहिंग्लज, हातकणंगले, करवीर, शिरोळ, कराड  येथे त्यांच्या जाहीर सभा घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याचा तपशील अद्याप समजला नसला तरी ते आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शनिवारी सांगलीला जाणार होणार असल्याचे समजते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: