Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाठार निंबाळकर येथे दोन बालकांचा अकस्मात मृत्यू
ऐक्य समूह
Wednesday, November 22, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: re4
5फलटण, दि. 21 : वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील शिवानी संतोष कदम (वय 11 महिने) व शिवराज संतोष कदम (वय 4 वर्षे) ही मुले गेले तीन-चार दिवस आजारी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी शिवानीचातर दुपारी शिवराजचा मृत्यू झाला.
त्यांचे वडील संतोष वामन कदम व आई सौ. पूजा यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. नक्की प्रकार काय व कसा घडला, हे समजू शकले नाही.
या दोन बालकांच्या मृत्यूबद्दल तर्कवितर्क करण्यात येत आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्यात अजून नोंद झालेली नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: