Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड येथून चोरी केलेल्या सिगारेटची पुण्यात विक्री
ऐक्य समूह
Saturday, November 18, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: re5
संबंधित टोळीवर राज्यभरात 9 गुन्हे; सहा जणांना पोलीस कोठडी
5कराड, दि.17: वारुंजी फाटा, ता. कराड येथील सतनाम एजन्सीच्या गोदामातून 32 लाखांच्या सिगारेट मालाची चोरी करून पुण्यातील टोळीने त्याची पुणे येथेच विक्री केल्याचे कराड शहर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. सिगारेट चोरी हीच या टोळीची खासियत आहे. या टोळीवर राज्यात विविध शहरात सिगारेट चोरीचे नऊ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सतनाम एजन्सीतील चोरी प्रकरणी अटक केलेल्या सहा जणांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि.22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
येथील व्यापारी अनिल बसंतांनी यांच्या मालकीच्या वारूंजी फाटा येथील सतनाम एजन्सीच्या गोदामातून पावणेचार लाखाच्या रोख रक्कमेसह 32 लाखांच्या सिगारेट मालाची दि.13 जुलै रोजी मध्यरात्री चोरी झाली होती. या चोरीप्रकरणी शहर पोलिसांनी पुणे येथील तेजस चंपालाल उनेजा, सुरेश हरिराम चौधरी, मुकेश मोहन चौधरी, सुरेंद्र अस्लारामजी चौधरी, चंपालाल ओघाराम वर्मा, रतनलाल नागाराम डांगे या सहा संशयितांना अटक केली आहे. पोलीस चौकशीत या टोळीने कराडमधील चोरीसाठी पिकअप जीप सोबत आणली होती. चोरीनंतर सिगारेटचा माल पिकअप जीपमध्ये भरून पुणे येथे नेण्यात आला. त्यानंतर त्याची निम्म्या किंमतीने एका व्यापार्‍याला विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.  
या टोळीवर मुंबई, पुणे, खानापूर, लोणावळा व अन्य
विविध ठिकाणी जवळपास 9 गुन्हे दाखल आहेत. सतनाम एजन्सीतून सिगारेट चोरी झाल्याचा गुन्हा शहर पोलिसात दाखल
झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. पोलिसांकडून सिगारेट चोरट्यांचा शोध सुरू होता. एका चोरट्याचे नाव निष्पन्न
करण्यात पोलिसांना यश आले होते. त्याच्यावर छापा टाकण्याची कारवाई करण्याची पोलिसांची तयारी सुरू असतानाच त्याच चोरट्याला मुंबई पोलिसांनी पकडले. त्यानंतर चोरट्याचे
अन्य साथीदार गजाआड झाले. मुंबई, पुणेसह कराड व अन्य ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची कबुली या टोळीने पोलिसांना दिली.
त्यामुळे पुणे पोलिसांकडून ताबा घेवून कराड पोलिसांकडून या टोळीला अटक करण्यात आली. या टोळीला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस
कोठडी सुनावली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: