Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: na4
केंद्र सरकारकडून दिवाळी भेट
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : देशभरातील अनुदानित विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना केंद्र सरकारने दिवाळी भेट दिली आहे. या प्राध्यापकांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत केली.
शिक्षण क्षेत्रात करियर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने देशभरातील 329 अनुदानित विद्यापीठे आणि 12192 महाविद्यालयांमधील सहाय्यक व सहयोगी प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा जावडेकर यांनी केली. 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन  लागू करण्यात आला असून प्राध्यापकांना मागील फरकही मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयाचा लाभ देशभरातील 7 लाख 58 हजार प्राध्यापकांना मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य व्ही. एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखाली 2016 मध्ये प्राध्यापकांच्या वेतन आढाव्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने प्राध्यापकांना 20 टक्के वेतनवाढ देण्याची शिफारस केली होती. प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन्सने केली होती. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशाराही या संघटनेने दिला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: