Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नगरसेवक बाळू खंदारेसह चार जणांचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 11 : सुरुचीवरील राड्या प्रकरणात नगरसेवक बाळू खंदारेसह चार जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर पुढील सुनावणी दि. 13 रोजी होणार आहे.
नगरसेवक बाळू खंदारे, सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, फिरोज पठाण यांच्यावतीने अ‍ॅड. पराग जाधव यांनी अर्ज दाखल केले आहेत. माजीउपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांच्यावतीने अ‍ॅड. अरविंद कदम यांनी अर्ज दाखल केला आहे.
हे चारही अर्ज न्यायालयाने दाखल करून घेतले आहेत. त्याशिवाय नियमित अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन द्यावा, अशी मागणीही संशयितांच्या वकिलांनी न्यायालयात केली आहे. त्यावर पोलिसांचे म्हणणे न्यायालयाने मागवले आहे.
चौघांना एक दिवसाची कोठडी
 सुरुचीवरील राड्या प्रकरणात पहिल्या दिवशी अटक करण्यात आलेल्या संशयित हर्षल चिकणेसह चार जणांची पोलीस   कोठडीची मुदत संपल्याने त्यांना दुसर्‍या गुन्ह्यात हजर करण्यात
 आले. त्यामध्ये त्यांना आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
एकाला पाच दिवस कोठडी
दरम्यान, या प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आलेल्या
केदार राजेशिर्के या संशयितास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: