Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लँड माफियांच्या विरोधात पाचगणी बंदला शंभर टक्के प्रतिसाद
ऐक्य समूह
Wednesday, October 11, 2017 AT 11:42 AM (IST)
Tags: re1
5पाचगणी, दि. 10 : खबरदार, यापुढे स्थानिकांच्या नादाला लागाल तर ... प्रशासनाने यापुढे गांधारीची भूमिका घेतली तर कायदा आम्हीच पाळायचा का? असा नियम आम्ही सहन करणार नाही. बास झालं, आता पाणी नाकापर्यंत पोहचलंय, यापुढे चुकीला माफी नाही! अशी भीमगर्जना करून महाबळेश्‍वर तालुका संघर्ष समितीने प्रशासनाला आणि समाजाला त्रास देणार्‍यांविरोधात पोलीस तक्रारीचीच वाट पाहणार का, असा संतप्त प्रश्‍न उपस्थित केला. आजचा पाचगणी बंद 100 टक्के यशस्वी झाला.
पाचगणी शहरासह संपूर्ण महाबळेश्‍वर तालुक्यात मनगटशाही, माहितीच्या अधिकाराचा वापर करून धमकावून, आपल्या पक्षाच्या लेटर हेडचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणार्‍या, करोडो रुपयांच्या जमिनी, जागा, बंगले हडपणार्‍या प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पाचगणी शहरातील व्यापार्‍यांनी सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन संघर्ष समितीच्या हाकेला साथ दिली. तर गुरेघर, भोसे, भिलार, तायघाट, दांडेघर या गावानेही 100 टक्के बंद पाळला. आज सकाळी 10 वाजता पाचगणीसह परिसरातील भिलार, गुरेघर, भोसे, तायघाट, पांगारी, दांडेघर, गोडवली, राजपुरी, खिंगर, आंब्रळ, मेटगुताड या गावातील ग्रामस्थ व महिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जमा झाले. या ठिकाणी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा विठ्ठल मंदिर, छ. शिवाजी चौक मार्गे बस स्थानकावर आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला, पुरूष व युवक सहभागी झाले होते. बस स्थानकाला वळसा घालून हा मोर्चा पुढे शिवाजी चौकात आला. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात झाले.
प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत येथे येत नाहीत तोपर्यंत आम्ही चौकातून हलणार नाही, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, सभापती रुपाली राजपुरे, माजी उपनगराध्यक्ष वसंतराव बिरामणे, शेखर कासुर्डे, अंकुश मालुसरे, नगरसेवक नारायण बिरामणे, विठ्ठल बगाडे, दिलावर बागवान, किसनशेठ भिलारे, राजेंद्र भिलारे, अजित कासुर्डे, विजय भिलारे, विनोद कळंबे, प्रवीण भिलारे, भारत पुरोहित, तानाजी भिलारे, शेखर भिलारे, मेहुल पुरोहित यांच्यासह पाचगणी व परिसरातील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी दांडेघरच्या थाप्यासंदर्भात सुरू असलेली गुंडगिरी, वीज वितरण आणि महसूल विभागाची या प्रश्‍नासाठी दादागिरी करणार्‍यांना होत असलेली मदत यामुळे हा प्रश्‍न चिघळला आहे. यातील दोषींवर कारवाई करावी, उतार्‍यावर घरपड नसतानाही येथे वीज कनेक्शन दिली जातेय, कोर्टाचा मनाई आदेश असतानाही गुंडांकडून पाचगणीच्या गुहेचा ताबा मिळवण्यासाठी सुरू असलेली संघटनेची धटिंगशाही, गुरेघरच्या जमिनीचा प्रश्‍न, सलीम मोघल यांच्या जागेबाबत दमदाटी या विषयावर तातडीने मार्ग काढावा, सर्वसामान्य नागरिक व स्थानिकांना न्याय मिळावा, माहितीच्या अधिकाराचा वापर करून ब्लॅकमेलिंग करण्याच्या प्रवृत्तींना उत आला आहे, असा सूर या जमावासमोर उपस्थितांनी आळवला. साईटवर जाऊन फोटो काढायचे, बांधकाम पाडायला लावतो, अशी भीती दाखवायची आणि मग दमदाटी करून पैसे उकळण्याचा धंदा या तालुक्यात फोफावला आहे. यावर स्थानिकांना न्याय मिळावा, अशी मागणी बाळासाहेब भिलारे, शेखर कासुर्डे, राजेंद्रशेठ राजपुरे, अजित कासुर्डे, किसनशेठ भिलारे, तानाजी भिलारे, मेहुल पुरोहित आदींनी आपल्या भाषणाद्वारे केली. संतप्त मोर्चेकरी रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. गुरेघरपासून पाचगणी, दांडेघरपर्यंत सर्व बाजारपेठ बंद असल्याने पर्यटकांना या बंदचा फटका बसला. 12 वाजता वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, महाबळेश्‍वरचे तहसीलदार रमेश शेंडगे, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता नितीन पवार आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यानंतर पाचगणी पोलीस ठाण्यात संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी पोलीस प्रशासनाने चर्चा केली. यावेळी राजेंद्रशेठ राजपुरे यांनी अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने पीडित लोकांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, थाप्यावर कसलेही घर नसताना घरपड लागली कशी, लावली जाते? घरपडीच्या कागदाची ढाल करून वीज वितरणही वीज द्यायला तयार होतंय हा कसला न्याय? यावर तहसीलदार शेंडगे यांनी याबाबत वीज वितरण कंपनीने आमच्याकडे खुलासा मागितला असून चौकशी करून आम्ही उतार्‍यावरील घरपड काढून दोषींवर कारवाई करू, असे सांगितले. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून ब्लॅकमेलिंग करणे, दादागिरी करून जागा व बंगले ताब्यात घेणे अशा भानगडी करणार्‍या लोकांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात देण्यासाठी पुढे आल्यास त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अजित टिके व पाचगणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी दिली. यावर प्रशासन आणि समाजाला माहिती अधिकाराच्या माध्यमातून वेठीस धरणार्‍या प्रवृत्तींचा हेतू प्रशासनाला माहिती असूनही प्रशासन पीडितांकडून तक्रार करण्याची वाट पाहत असेल तर हे चक्र कधी थांबणार? असा प्रश्‍न उपस्थित केला.
शांततामय मार्गाने बंद यशस्वी
1) संघर्ष समितीच्या हाकेला साद देऊन पाचगणी कडकडीत बंद ठेवली गेली. दिवसभर पाचगणीचे रस्ते निर्मनुष्य होते. सपोनि. तृप्ती सोनावणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपालिकेने अग्निशामक बंब सज्ज ठेवला होता. शांततामय मार्गाने बंद यशस्वी झाला.
 दांडेघर ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय
2) या बंदमध्ये दांडेघर ग्रामस्थांची उपस्थिती मोठी होती. यातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दांडेघर थाप्याचा ताब्याचे महत्त्व या संख्येत स्पष्ट दिसत होता.
बंदमध्ये सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची उपस्थिती
3) बंद मध्ये सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची उपस्थिती जाणवत होती. बीजेपी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेच्या कार्यकर्त्यांसह माजी उपनगराध्यक्ष विठ्ठल बगाडे, दिलावर बागवान यांची उपस्थिती या प्रश्‍नासाठी लोक किती आग्रही आहेत हे दर्शवणारी होती.
यापुढे ब्लॅकमेलरांची गय करणार नाही
4) ब्लॅकमेल करणार्‍याची आता गय करणार नाही, असा सूर सर्वां-नीच यावेळी आळवला. यापुढे स्थानिकांना अवैध पद्धतीने  पैसे माग-णार्‍यांना सडकून काढू, असा आक्रमक सज्जड दम संघर्ष  सि
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: