Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात 61 ग्रामपंचायती तर 68 सरपंच बिनविरोध
ऐक्य समूह
Saturday, October 07, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 6 : जिल्ह्यातील निवडणूक होणार्‍या 318  ग्रामपंचायतींपैकी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसानंतर 61 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 68 सरपंच बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान 256 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 868 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 318 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. सदस्यपदासाठी तसेच सरपंचपदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले होते. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर 61 ग्रामपंचायती बिनविरोध तर 68 सरपंच बिनविरोध झाले. त्यात सातारा तालुक्या-तील 38 पैकी 
9 ग्रामपंचायती तर 9 सरपंच बिनविरोध झाले असून 28 ग्रामपंचायतींसाठी 97 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जावली तालुक्यातील 15 पैकी 5 ग्रामपंचायती तर 6 सरपंच बिनविरोध झाले असून 10 ग्रामपंचायतींसाठी 21 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. कोरेगाव तालुक्यातील 51 पैकी 13 ग्रामपंचायती तर 10 सरपंच बिनविरोध झाले असून 38 ग्रामपंचायतींसाठी 51 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. वाई तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींसाठी 32 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. खंडाळा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींसाठी 16 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. महाबळेश्‍वर तालुक्यातील 6 पैकी 5 ग्रामपंचायती तर 5 सरपंच बिनविरोध झाले असून 1 ग्रामपंचायतीसाठी 3 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. कराड तालुक्यातील 44 पैकी 4 ग्रामपंचायती तर 7 सरपंच बिनविरोध झाले असून 40 ग्रामपंचायतीसाठी 140 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. पाटण तालुक्यातील 86 पैकी 16 ग्रामपंचायती तर 20 सरपंच बिनविरोध झाले असून 70 ग्रामपंचायतीसाठी 223 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. माण तालुक्यातील 30 पैकी 6 ग्रामपंचायती तर 8 सरपंच बिनविरोध झाले असून 24 ग्रामपंचायतीसाठी 72 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. खटाव तालुक्यातील 15 पैकी 2 ग्रामपंचायती तर 2 सरपंच बिनविरोध झाले असून 13 ग्रामपंचायतीसाठी 54 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. फलटण तालुक्यातील 24 पैकी 1 ग्रामपंचायत तर 1 सरपंच बिनविरोध झाला असून 23 ग्रामपंचायतींसाठी 94 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: