Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खाजगी सावकार महेश तपासेला आणखी चार दिवस पोलीस कोठडी
ऐक्य समूह
Wednesday, September 13, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 12 :खाजगी सावकारीच्या प्रकरणातील महेश तपासे याच्या पोलीसकोठडीची मुदत संपल्याने त्यास मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीच्या मुदतीत चार दिवसांनी वाढ केली आहे. त्यास दि. 16 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महेश तपासे याचा सातारा व परिसरात मोठा खाजगी सावकारीचा व्यवसाय असल्याचे उघड झाले आहे. प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर याच्यापेक्षाही जादा रक्कम व्याजाने बाजारात महेश तपासे आणि त्याच्या टोळीने फिरवली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पण्ण झाले आहे. महेश तपासेकडे सापडलेल्या धनादेशाची संख्याही 55 वर पोहचली आहे. त्याशिवाय त्याच्याकडे सापडलेल्या 14 दस्तांचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यातील बहुतांश तक्रारदारांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावूनघेतले असून त्यांनी व्याजाने पैसे घेतल्याचे जबाब पोलिसांना दिले आहेत.  
 त्यामुळे पोलिसांना आता किती गुन्हे दाखल करायचे आणि ते कसे करायचे याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
महेश तपासे याच्यावर जास्त गुन्हे दाखल होवू नयेत यासाठी पोलिसांवर आणि तक्रारदारांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तक्रारदारांना संरक्षण देवून पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे चौकशी करुन कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: