Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ट्रकचा ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात एक ठार
ऐक्य समूह
Wednesday, September 13, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 12 : सातारा-लोणंद रस्त्यावर पिंपोडे खुर्द येथे खड्ड्यात पडून ट्रकचा ब्रेक फेल होवूनझालेल्या अपघातात तीन जण जखमीझाले होते. त्यांना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना पर्वतसिंह रामचरण पाल (वय 25, रा. सतनवाडा, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, बेळगाव येथून बटाटा भरुन ट्रक बरेली, उत्तरप्रदेश येथे निघाला होता. सातारा-लोणंद रस्त्यावर पिंपोडे खुर्द येथे ट्रक आला असता रस्त्यातील खड्ड्यात आदळला आणि त्यामुळे ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे ट्रकचे स्टेअरिंग लॉक झाले आणि ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पुलावरुन खाली कोसळला. या घटनेत तीन जण जखमी झाले होते.    
 त्यामध्ये पर्वतसिंह पाल, चालक अजमेरी रामदयाल पाल, दीपक सिध्दार्थ पाल यांचा समावेश आहे. त्यापैकी पर्वतसिंह पाल यांचाउपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: