Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विवाहाचे आमिष दाखवून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍याकडून युवतीवर बलात्कार
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: lo3
 युवती आठ महिन्यांची गर्भवती
5सातारा, दि. 8 : स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या युवकाने विवाहाचे आमिष दाखवून युवतीवर वारंवार बलात्कार केला आणि त्यानंतर विवाहास नकार देवून तिची फसवणूक केली.  या घटनेमुळे संबंधित युवती आठ महिन्यांची गर्भवती झाली आहे. या प्रकरणी संबंधित युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. सतीश सयाजीराव जाधव (वय 27, मूळ रा. बार्शी, सोलापूर, सध्या रा. पालवी चौक, गोडोली, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित हा सातार्‍यात शिक्षणासाठी आला असून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये त्याची व तक्रारदार 23 वर्षीय युवतीची नवरात्रामध्ये ओळख झाली. 
ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. त्यावेळी युवकाने युवतीला विवाहाचे आमिष दाखवून जानेवारी 2017 पासून वेळोवेळी शरीर संबंध केले. त्यातूनच संबंधित युवती गर्भवती राहिल्याने तिने त्याच्या पाठीमागे विवाहाचा तगादा लावला.   मात्र ऐनवेळेस त्याने विवाहाला नकार दिला. या घटनेनंतर पिडीत युवतीने शहर पोलीस ठाण्यात युवकाविरुध्द तक्रार दिली. या घटनेने सातारा परिसरात खळबळ उडाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: