Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना पाणलोट परिसरात पावसाची रिपरिप
ऐक्य समूह
Monday, August 14, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: re6
87.68 टीएमसी पाणीसाठा
5पाटण, दि. 13 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप वाढत असून गेल्या चोवीस तासात जलाशयात 8 हजार 240 क्युसेक्स प्रतिसेकंदने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा 87.68 टीएमसी एवढा झाला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर नसला तरी पावसाची रिपरिप मात्र सुरू आहे. दरम्यान गतवर्षी याच तारखेला कोयना धरणात तब्बल 95.15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तो आजच्या घडीला 7.48 टीएमसीने कमी आहे.
गेल्या आठ दिवसापासून पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे उसंत दिल्याने जलाशयातील पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. मात्र दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाची   रिपरिप सुरू झाली आहे. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्याने जलाशयातील येणार्‍या पाण्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढत आहे.गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 17 (3470), नवजा 16 (3948), महाबळेश्‍वर 8 (3359) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जलपातळी 2149 फूट 9 इंच व 655.244 मीटर इतकी झाली आहे. जलाशयात 8 हजार 240 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून 87.68 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पूर्ण
क्षमतेने भरण्यासाठी केवळ 17.57 टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: