Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाच तालुक्यातून सातार्‍यातील दोन जण दोन वर्षासाठी तडीपार
ऐक्य समूह
Saturday, August 12, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 11 : साताराशहर हद्दीत गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्द व मालमत्तेचे गुन्हे दाखल असलेल्या टोळीचा प्रमुख शुभम विनोद कांबळे (वय 24, रा. 263, बुधवार नाका, सातारा) आणि टोळी सदस्य अतुल राजू भोसले (वय 22, रा. 27, बुधवार नाका, सातारा) या दोघांना पाच तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
या दोघांवर जबरी चोरी, गर्दी मारामारी, आदेशाचा भंग, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. त्यांना वेळोवेळी सुधारणेची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याकरिता मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून सातारा शहर व परिसर हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये म्हणून या टोळीतील दोन इसमांना हद्दपार    करणेबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची सुनावणी होवून त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये सातारा, कोरेगाव, जावली, वाई व कराड तालुका हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: