Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इन्कम टॅक्स रिटर्न्स आजच भरा
ऐक्य समूह
Monday, July 31, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : 2016-17 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्रे (इन्कम टॅक्स रिटर्न्स) भरण्याची अंतिम मुदत उद्या, दि. 31 जुलैपर्यंत असून ही मुदत वाढवण्यात येणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने रविवारी स्पष्ट केले. त्यामुळे करदात्यांना उद्याच आपली प्राप्तिकर विवरणपत्रे भरावी लागणार आहेत.
प्राप्तिकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, 2016-17 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. ही मुदत वाढवण्याचा कोणताही विचार नाही. आतापर्यंत दोन कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे ऑनलाइन भरण्यात आली आहेत. उर्वरित करदात्यांनी आपली विवरणपत्रे मुदतीत भरावीत.
प्राप्तिकर विभागाच्या ‘ई-फायलिंग’ संकेतस्थळामध्ये काही प्रमाणात बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत विचारले असता, या संकेतस्थळावर कोणताही मोठा तांत्रिक बिघाड निर्माण झालेला नाही. या पोर्टलच्या देखभालीमुळे काही वेळ बिघाड निर्माण झाला होता. मात्र, आता संकेतस्थळ सुरळीत सुरू आहे. करदात्यांनी हीींिं://ळपलेाशींरुळपवळरशषळश्रळपष.र्सेीं.ळप/ या संकेतस्थळावर आपली विवरणपत्रे ऑनलाइन भरावीत.
करदात्यांनी आपली खरी माहिती विवरणपत्रांमध्ये द्यावी, असे आवाहनही या अधिकार्‍याने केले. प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यासाठी आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांकाला जोडणे सक्तीचे असून त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू झाली आहे. निश्‍चलनीकरणाच्या निर्णयानंतर गेल्या वर्षी 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या
कालावधीत दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम बॅँक खात्यांमध्ये जमा केली असेल तर त्याची माहितीही जाहीर करावी, असे आवाहनही या अधिकार्‍याने केले.                  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: