Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

राष्ट्रद्रोह्यांचे फुत्कार
vasudeo kulkarni
Saturday, July 29, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: lolak1
तमिळनाडू राज्यातल्या सर्व सरकारी, खाजगी कार्यालये आणि शाळा, महाविद्या-लयातून मातृभूमीला वंदन करणार्‍या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताचे आठवड्यातून एकदा तरी गायन सक्तीने झालेच पाहिजे, असा आदेश तमिळनाडू उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. पण, या आदेशामुळे महाराष्ट्रातल्या समाजवादी पक्षाचे धर्मांध आमदार अबू आझमी आणि एम. आय. एम. चे आमदार वारीस पठाण यांचे मात्र पित्त खवळले आहे. वंदे मातरम् या राष्ट्रगीताच्या गायनाबद्दल तमिळनाडू उच्च न्यायालयाने केलेल्या सक्तीमुळे, या दोन्ही मुस्लीम धर्मांध आमदारांना थयथयाट आणि अकांडतांडव करायचे काही कारणही नव्हते. पण, वंदे मातरम्ची सक्ती करणे, म्हणजे राज्यघटनेने मुस्लिमांना दिलेल्या तथाकथित धर्मस्वातंत्र्यावर घाला असल्याचा आव आणत आझमी, यांनी बेशरमपणे वंदे मातरम् या राष्ट्रगीताचाच अपमान केला आहे. आपण ‘वंदे मातरम्’ चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला ‘वंदे मातरम्’ म्हणायची परवानगी देत नाही. आम्हाला या देशातून बाहेर काढा, पण मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाहीत. मग, कारवाई करा किंवा तुरुंगात टाका असे राष्ट्रद्रोही फुत्कार या आझमीने विधानभवनाच्या परिसरातच काढले आणि वारीस पठाण यांनी त्यांना साथ देत ‘माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी वंदे मातरम् गाणार नाही, सरकारने काय करायचे ते करावे, अशी चिथावणीखोर भाषाही वापरली.
स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ केंद्रात आणि राज्या- राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी मते आणि सत्तेसाठी धर्मांध मुस्लिमांच्या अलगतेच्या भावनेला खतपाणी घातले. धर्मांधांना मोकाट सोडले. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या शिवसेना, भारतीय जनता पक्षांना प्रतिगामी ठरवत याच काँग्रेसने धर्मांध मुस्लीम लीगला मात्र पुरोगामी ठरवले. सत्तेसाठी मुस्लीम लीगला निर्लज्जपणे मिठ्याही मारल्या. परिणामी याच देशात जन्मलेल्या धर्मांध मुल्ला मौलवी आणि जात्यंध मुस्लीम नेत्यांना आपण मुस्लीम धर्माच्या पवित्र ग्रंथाशिवाय कुणालाही मानत नाही, हा ग्रंथ म्हणजेच आमचा कायदा इथले कायदेकानू आम्हाला लागू नाहीत, आम्ही आमच्या धर्माप्रमाणेच वर्तन करणार, असा फुटीरतावादी प्रचार करायला रान मोकळे मिळाले. वंदे मातरम् हे केवळ राष्ट्रगीत नाही. याच गीतामुळे ब्रिटिशांच्या राजवटीत स्वातंत्र्य संग्रामाचा वणवा पेटला. वंदे मातरम् म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची गीता आणि अस्मिता ठरली. शेकडो स्वातंत्र्यवीरांनी-क्रांतिकारकांनी वंदे मातरम्चा घोष करीत फाशीचे फास आपल्या गळ्याभोवती हासत हासत अडकवून घेतले. त्या पवित्र आणि राष्ट्राची अस्मिता असलेल्या राष्ट्रगीताचा अपमान करणार्‍यांना हा इतिहास माहितीही आहे. पण, मुस्लिमांची धर्मांधता जोपासायसाठीच आझमी आणि पठाण हे आमदार मातृभूमीबद्दल अवमानास्पद वक्तव्य करीत गरळ ओकत आहेत. त्यांना वंदे मातरम् म्हणणे हा आपल्या धर्माचा अवमान आहे, असे वाटत असेल, तर त्यांनी बांगला देश किंवा पाकिस्तान किंवा अन्य मुस्लीम राष्ट्रात चंबू गबाळे आवरून चालते व्हावे. त्यांना याच देशात राहायचे असेल, तर ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागेल. या गीताचा आदर त्यांना ठेवावाच लागेल. वंदे मातरम् ही काही विचारधारा नाही. ते भारतीय स्वातंत्र्याचे तेजस्वी स्तोत्र आहे आणि त्याचा सन्मान सर्व भारतीयांनी ठेवायलाच हवा. राज्यघटनेनेही वंदे मातरम् म्हणू नये, असे कुठेही लिहिलेले नाही. बांगला देश हा बहुसंख्य मुस्लीम धर्मीयांचाच देश असला, तरी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेेले ‘आमार सोनार बांगला’, हे बंगाली राष्ट्रगीत त्या देशातली सर्वच जनता अभिमानाने गाते. आपल्या सोयीपुरता आणि धर्मांध भावना भडकवायसाठी धर्माचा आधार घेणार्‍या या असल्या प्रवृत्ती सरकारने ठेचायलाच हव्यात. अन्यथा या धर्मांधांना समाजच चोख प्रत्युत्तर देईल, याची गंभीर दखल सरकारनेही घ्यायला हवी आणि त्याच्या चुरुचुरू बोलणार्‍या  जिभांना आवर घालायला हवा.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: